चक्क लाचेसाठी जिल्हा परिषदेत फ्री स्टाईल हाणामारी; उस्मानाबाद जिल्हा परिषदेतील प्रकार

जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरु आहे. कामाचे कंत्राट देताना टक्केवारी घेणे तसेच कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बिले यात चिरीमिरी घेणे राजरोस सुरु आहे.

    सोलापूर / उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा परिषदेत लाचेसाठी कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात कोरोना काळात शासकीय रकमेची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली. अनेक बोगस बिले जोडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला. कामाचे कंत्राट देताना कमिशन घेण्यात आले.

    कर्मचाऱ्यांच्या बदल्या, त्यांची बिले काढताना चिरीमिरी घेण्यात आली. आलेल्या या कमिशन वाटणीवरून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि जिल्हा अकांऊट व्यवस्थापक यांच्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनातच फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची चर्चा जोर धरली आहे.

    उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरु आहे. कामाचे कंत्राट देताना टक्केवारी घेणे तसेच कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बिले यात चिरीमिरी घेणे राजरोसपणे सुरु आहे. आलेल्या या रक्कमेच्या वाटणीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात दोन कर्मचाऱ्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. या हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज मागणी केली असता, धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

    या प्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज मागणी केली असता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात सीसीटीव्ही बसवण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरु आहे. त्याचा बोभाटा होऊ नये म्हणून सीसीटीव्ही बसवण्यात आले नाहीत, असा आरोप सुभेदार यांनी केला आहे.