पनवेल लोकलमध्ये महिलांमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी

    कोपरखैरणे : ठाणे – पनवेल या ट्रान्स हारबर मार्गांवरील लोकल मध्ये पनवेल च्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिला प्रवाश्यांमध्ये आसनावर बसण्याच्या कारणावरून फ्रिस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला.
    तुर्भे स्थानकात चढलेल्या महिलेचा व ठाण्यावरून येतं असलेल्या महिला प्रवाश्यमध्ये तुंबल हाणामारी झाली सदर भांडण सोडविण्यासाठी रेल्वेच्या डब्यात आलेल्या महिला पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली यामध्ये महिला पोलीस देखील जखमी झाल्या असून वाशी पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलीस पुढील तपास करत आहेत.