
जगदीश सुतार हे १८ वर्षाचे असून त्यांची इंडिया बूक ऑफ़ रेकॉर्डने Hyper Realistic Pencildrawing साठी कौतुक करून पुरस्कृत केले आहे. जगदीश सुतार यांना 6 फेब्रुवारी रोजी कला क्षेत्रातील उत्तम कामगिरीची दाखल घेऊन, महाराष्ट्र राज्य कला कला गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.
उस्मानाबाद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा शहरातील भीम नगर येथे जगदीश सुतार आर्ट्सच्या वतीने ७ चौरस फूट आकाराची भव्य दिव्य अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व भगवान गौतम बुद्ध यांची रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीसाठी १० किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला असून जगदीश सुतार यांनी तब्बल ६ तास परिश्रम घेऊन ही बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी काढली आहे.
त्यांनी ही रांगोळी भीम नगर येथील मुख्य चौकात येणाऱ्या भाविक भक्तांना पाहण्यासाठी खुली केली आहे. सर्वच प्रेक्षकांसाठी ही रांगोळी मुख्य आकर्षणाचा केंद्र बनली आहे. जगदीश सुतार हे १८ वर्षाचे असून त्यांची इंडिया बूक ऑफ़ रेकॉर्डने Hyper Realistic Pencildrawing साठी कौतुक करून पुरस्कृत केले आहे. जगदीश सुतार यांना 6 फेब्रुवारी रोजी कला क्षेत्रातील उत्तम कामगिरीची दाखल घेऊन, महाराष्ट्र राज्य कला कला गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.