राजापूर हायस्कुलचे संगित शिक्षक उमाशंकर दाते यांचा जी-२० भारत २०२३ मध्ये सहभाग, उमाशंकर दाते यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

उमाशंकर दाते हे राजापूर हायस्कुलमध्ये कलाशिक्षक असून त्यांनी कालबाह्य झालेल्या रिड ऑर्गन या वाद्याच्या पुनर्निर्मितीला १० वर्षांपूर्वी सुरुवात केली व त्यात यश मिळवले.

    राजापूर : राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचे सुपुत्र उमाशंकर (बाळ) दाते यांना जागतिक दर्जाच्या अशा G20 summit 2023 च्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. उमाशंकर दाते हे राजापूर हायस्कुलमध्ये कलाशिक्षक असून त्यांनी कालबाह्य झालेल्या रिड ऑर्गन या वाद्याच्या पुनर्निर्मितीला १० वर्षांपूर्वी सुरुवात केली व त्यात यश मिळवले.

    जुन्या शास्त्रिय संगीत नाटकांमध्ये या रिड ऑर्गनचा वापर केला जायचा मात्र काळाच्या ओघात हे रिड ऑर्गन कालबाह्य झाले होते. उमाशंकर दाते यांनी या कालबाह्य झालेल्या रिड ऑर्गनला पुन्हा जीवनदान देण्यात यश मिळवले आहे. सध्या त्यांनी बनवलेले हे रिड ऑर्गन देशाबाहेर जात आहेत. उमाशंकर दाते हे स्वत: या रिड ऑर्गनचे उत्कृष्ट वादक आहेत. त्यांनी खुप मेहनतीने व जिध्दीने यामध्ये प्राविण्य मिळवले आहे .

    त्यामुळेच त्यांना सध्या दिल्ली येथे होत असलेल्या जी २० च्या कार्यक्रमात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. आडिवरे सारख्या छोट्या खेडेगावातून ते जगातील प्रमुख जी 20 देशाच्या प्रमुखांसमोर जाऊन आपली ओळख दाखवणं हे खरच खूप मेहतीने आणि जिद्दीने शक्य होते त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.