गगन नारंगचे फाउंडेशन व वॉल्थरतर्फे पॅरिस कोटा विजेत्या नेमबाजांना सहकार्य

    पुणे : गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाऊंडेशन (जीएनएसपीएफ) आणि  वॉल्थर या कंपनीने  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी हाेणाऱ्या नेमबाजांना सहकार्य केले अाहे. या सहकार्यातंर्गत त्यांना हाय – एंड रायफल भेट स्वरुपात िदली गेली.

    नेमबाजी या प्रकारात वापरण्यात येणाऱ्या रायफल, पिस्तुल तयार करणारी ‘वाॅल्थर’ ही जर्मन कंपनी अाहे. अाॅलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत पाेहचणाऱ्या नेमबाजांपैकी ९० टक्के नेमबाज हे याच कंपनीची उत्पादने वापरतात. या कंपनीने पॅरीस येथील अाॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी हाेणारे भारताचे नेमबाज रुद्रांक्ष पाटील आणि मेहुली घोष तसेच पॅरालिम्पिक कोटामध्ये समावेश होण्याची दाट शक्यता असलेले स्वरूप उन्हाळकर यांना अत्याधुनिक अर्थात हाय-एंड रायफल भेट दिली. एका रायफलीची किंमत सुमारे पावणे चार लाख रुपये इतकी अाहे. यासंदर्भात गगन नारंग, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नहार्ड नोबेल,  वितरण संचालक द्रागर क्लाऊस,  नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) चे संयुक्त सचिव आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (आयएसएसएफ) चे पंच समिती सदस्य पवन सिंह यांनी याविषयी पत्रकार परीषदेत माहीती िदली.

    “भारतीय नेमबाजांनी जास्तीत जास्त ऑलिम्पिक पदके जिंकावीत हे आमचे स्वप्न अाहे. त्यासाठी वॉल्थरसारख्या कंपनीने सहकार्य केले अाहे. नेमबाजी या खेळात तांत्रिक बाबी खुप असुन, त्यादृष्टीने  तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम आणि प्रगत रायफल्स वापरल्या पाहीजे.  पॅरिस ऑलिम्पिक कोटा प्राप्त खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या रायफल्स त्यांना केवळ अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठीच नव्हे तर स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकण्यास देखील मदत करतील, असा  विश्वास नारंग यांनी व्यक्त केला. नेमबाज पाटील म्हणाला, ‘‘ स्पर्धेसाठी तयारी करत असताना या टप्प्यात ही मदत आमच्यासाठी मोलाची आहे. नेमबाजीत अचूकता ही खूप महत्त्वाची असते आणि प्रत्येक गन बनविताना वॉल्थर ही अचूकता जपण्याची काळजी घेते. यामुळे पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी चांगली कामगिरी करण्यास यामुळे मला मदत होणार आहे.”