शिवार कृषी प्रदर्शनात ‘गजेंद्र’ रेड्याचीच चर्चा, दीड टन वजनी अन् एक कोटी रुपयांचा गजेंद्र रेडा सर्वांचे आकर्षक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथे सुरू असलेल्या शिवार कृषी (Krushi) प्रदर्शनात आलेला दीड टन वजनाचा रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘गजेंद्र’ रेड्याची (Gajendra Reda) मोठी चर्चा रंगली आहे ती त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी त्याने पाचव्या वर्षात पदार्पण केले. त्याचा जंगी वाढदिवस साजरा झाला.! त्याला पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली आहे.

    इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथे सुरू असलेल्या शिवार कृषी (Krushi) प्रदर्शनात आलेला दीड टन वजनाचा रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘गजेंद्र’ रेड्याची (Gajendra Reda) मोठी चर्चा रंगली आहे ती त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी त्याने पाचव्या वर्षात पदार्पण केले. त्याचा जंगी वाढदिवस साजरा झाला.! त्याला पाहण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली आहे.

    इस्लामपुरात क्रीडा संकुलाच्या मैदानावर शिवार कृषी प्रदर्शन भरले आहे. कृषी प्रदर्शनात गजेंद्र रेड्याची हजेरी लागल्याने शेतकऱ्यांची या रेड्याला बघण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. कृषी प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण असणारा दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा शुक्रवारी पाच वर्षाचा झाला. त्याचा वाढदिवस साजरा केला गेला. महिलांनी औक्षण केले तर गजेंद्रचा केक उपस्थित नागरिकांच्या हस्ते कापण्यात आला.स्वाभिमानीचे निमंत्रक भागवत जाधव यांनी केक कापला. राज्यभरात तो अनेक कृषी प्रदर्शनात गर्दी खेचत असताना त्याच्या वाढदिवसाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिक त्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत.

    रेड्याला तब्बल ८० लाखांची बोली

    कर्नाटक मधील मुंगसुळी या गावातील विलास नाईक या पशुपालक शेतकरी हा या गजेंद्र रेड्याचा मालक आहे. गजेंद्र विशेष म्हणजे त्याच्या वजनासाठी विख्यात आहे. त्याचे सुमारे दीड टन वजन असल्याने गजेंद्र जिथे जातो तिथे त्याचा तोरा कायमच असतो. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने या रेड्याला तब्बल ८० लाखांची बोली लावली होती. मात्र या रेड्याच्या मालकाने त्याला विकण्यास मनाई दाखवली. सध्या गजेंद्र रेड्याला एक कोटीला खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. परंतु गजेंद्र घरच्या म्हशीची पैदास असल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

    पशुपालक शेतकऱ्यांनी मोठी गर्दी

    गजेंद्र हा मुरा जातीचा रेडा आहे. देशातील अनेक कृषी प्रदर्शनात गजेंद्र रेड्याने हजेरी लावली आहे, आणि प्रत्येक कृषी प्रदर्शनात गजेंद्र हा प्रमुख आकर्षणाचा केंद्र ठरत असतो. पाहण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांनी मोठी गर्दी करत आहेत. दीड टन वजनी आणि एक कोटी रुपयांचा गजेंद्र रेडा आपल्या वजनामुळे आणि किंमतीमुळे मोठा जगविख्यात आहे. गजेंद्र याचे वजन ज्याप्रकारे सर्वांना त्याच्याकडे पाहण्यास भाग पाडते अगदी त्याच प्रकारे त्याचा खुराक देखील पाहण्यासारखा आहे. गजेंद्र एका दिवसात १५ किलो दूध, तीन किलो भरडा, तीन किलो आटा, पाच किलो सफरचंद, याशिवाय ऊस खात असतो. आपल्या देशात अनेक हौशी पशुपालक शेतकरी महागड्या पशुचे संगोपन करत असतात. हे यानिमित्ताने सिध्द झाले आहे.