Gambling den raided in Wardha city, Ramnagar police arrested 15 gamblers

१५ जुगा-यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगा-यांकडून रोख ३८२० रुपये, ५२ तास पत्ते असा ३८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Grab the item) करण्यात आला आहे.

    वर्धा : खुलेआम सुरू असलेल्या शहरातील जुगार अड्यावर (Gambling den) धाड टाकून तब्बल १५ जुगा-यांना अटक (15 Gambler arrested) करण्यात आली आहे. ही कारवाई रामनगर पोलिसांच्या (Ramnagar Police) वतीने करण्यात आली. जुगा-यांकडून रोख ३८२० रुपये, ५२ तास पत्ते असा ३८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Grab the item) करण्यात आला आहे.

    अटक करण्यात आलेल्या जुगा-यांची नावे अशी आहे – व्रषभ कैलासराम किन्नाके रा. इतवारा वर्धा, विनोद रामभाऊ चौधरी रा. काचनुर, नामदेव किसनाजी बारस्कर रा. रामनगर वर्धा, रमेश चंपतराव इंगळे रा. वाटखेडा, रवि बबनराव हुकुम रा. म्हाडा काँलनी, विक्की नामदेव खिल्लारे रा. इतवारा बाजार, महेश शरदराव चांदुरकर रा. साईनगर, शेख इमरान शेख नासीर रा. इंदिरानगर, मनोज चौनलाल कडुकर रा. आर्वी नाका, विजय वीरसेन उपष्याम रा. गांधीनगर, विकास ज्ञानेश्वर तराळे रा. गांधीनगर, प्रवीण प्रभाकर डहाके रा. गजानन नगर, आकाश रमेशराव खडसे रा. इंदिरानगर, मारोती मधुकरराव जगताप रा. आदिवासी कॉलनी व बाळक्रष्ण मनोहरराव बडगुजर रा. तडसे ले – आऊट वर्धा या १५ जुगा-यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.