ganpati

आज माघी गणेश जयंती निमित्ताने भक्तांनी राज्यभरातील विविध मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. काल रात्रीपासून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गर्दी केली आहे. सकाळी 5 वाजता झालेल्या आरतीमध्ये 100 ते 200 भाविक सामील झाले होते.

  मुंबई : आज माघी गणेश जयंती आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीची तिथी ही गणेश जयंती (Shri Ganesha Jayanti) म्हणून ओळखली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, पार्वतीचा पुत्र गणेशाचा या तिथीला जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला गणेश जयंती असेही म्हटले जाते. गणेश चतुर्थी तिथी 25 जानेवारीला म्हणजे आज दुपारी 3.22 मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी बुधवार 25 जानेवारीला रात्री 12.34 मिनिटांपर्यंत संपेल.

  सिद्धिविनायक, दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी

  दरम्यान, आज माघी गणेश जयंती निमित्ताने भक्तांनी राज्यभरातील विविध मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. काल रात्रीपासून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गर्दी केली आहे. सकाळी 5 वाजता झालेल्या आरतीमध्ये 100 ते 200 भाविक सामील झाले होते. त्याच वेळी, मुंबईतील अनेक भागातील लोक सिद्धिविनायक मंदिरात पालखींसह पोहोचले. तसेच पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे.

  मुंबईत विविध भागात पालख्या…

  दरम्यान, आज माघी गणेश जयंती आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीची तिथी ही गणेश जयंती (Shri Ganesha Jayanti) म्हणून ओळखली जाते. त्यामुळं आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळं आज मुंबईत विविध भागातून सिद्धीविनायक मंदिरात पालख्या आणल्या आहेत. घाटकोपरमधील भाविकांनी सांगितलं की आम्ही रात्री 10 वाजता पालखी घेऊन निघालो होते पहाटे तीनच्या सुमारास पोहोचलो. दोन वर्षानंतर हा उत्सव साजरा होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

  आज पूजेसाठी शुभ मुहूर्त

  आज माघ गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.29 ते 12.34 आणि रवियोग बुधवारीच सकाळी 06.44 ते 08.05 पर्यंत असेल. परीघ योग 24 जानेवारी रोजी रात्री 9.36 ते 25 जानेवारी सायंकाळी 6.15 पर्यंत असेल. शिवयोग 25 जानेवारीच्या संध्याकाळी 6.15 ते 26 जानेवारीला सकाळी 10.28 पर्यंत असेल. तसेच माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तिथी 25 जानेवारीला दुपारी 3.22 मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी बुधवार 25 जानेवारीला रात्री 12.34 मिनिटांपर्यंत संपेल.