गणेश मंडळाची गुरूवारी दुर्वांकुरला बैठक

पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सव (Ganesh Festival) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पुणे पोलिसांकडून (Pune Police) आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीतील सावळा गोंधळ समोर आला आहे. पोलिसांनी शहरातील मानाच्या गणपतींची स्वतंत्र बैठक घेत इतर मंडळांना वेगळा वेळ दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

    पुणे :  पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेश मंडळ, प्रशासन व पुणे पोलिसांनी याची जय्यत तयारी सुरू केली आहे. गुरूवारी सायंकाळी मध्यभागात पोलीस व गणेश मंडळाची एकत्रित बैठक आयोजित केली आहे.

    दरम्यान, पोलीस आयुक्तालयात पहिली बैठक आयोजित केली होती. पण, तेथे वेळेअभावी मंडळात नाराजी पसरल्याने पोलिसांनी त्यांची समजूत काढत गुरूवारी लागलीच सर्व मंडळाची बैठक आयोजित केली.