गणेश नागरी पतसंस्था निवडणूक बिनविरोध

वाई शहरातील गणेश नागरी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यामध्ये चेअरमनपदी अनंत मोरे, व्हाईस चेअरमन पदावर-किसन ढगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर नूतन संचालकपदी मोअज्जम इनामदार,नितीन नायकवडी,अनिल ठोंबरे,अक्षय मोरे, मंदा चव्हाण बिनविरोध निवड करण्यात आली

    वाई :वाई शहरातील गणेश नागरी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यामध्ये चेअरमनपदी अनंत मोरे, व्हाईस चेअरमन पदावर-किसन ढगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर नूतन संचालकपदी मोअज्जम इनामदार,नितीन नायकवडी,अनिल ठोंबरे,अक्षय मोरे, मंदा चव्हाण बिनविरोध निवड करण्यात आली तर तज्ञ संचालक म्हणून श्रीपाद कुलकर्णी व विश्वास गायकवाड यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून एन जे साबळे यांनी काम पाहिले.

    वाई शहरात गणेश नागरी पतसंस्था कारभार स्वच्छ व पारदर्शक ठरल्यामुळे बँकेचे खातेदार ठेवीदार व सभासद विश्वासात पात्र ठरली आहे भविष्यात संस्था सभासदांची आर्थिक गरज भागविण्यासाठी आवशक्यते नुसार कर्ज पुरवठा उपलब्ध करून सभासदाच्या आर्थिक प्रगतीसाठी हातभार लावला जाईल. सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेवून संस्थेचा कारभार पारदर्शक केला जाईल, असा विश्वास नूतन चेअरमन व व्हा चेअरमन यांनी व्यक्त केला. संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याकरता सुधाकर वाईकर, सुधीर खरात मानसिंग वाघ विश्वास गायकवाड यांनी परिश्रम घेतले मदन नायकवडी यांनी सूत्र संचालन व आभार मानले.