शेतात एकटी असलेल्या महिलेवर 3 नराधमांचा सामुहिक अत्याचार; हत्या करुन ‘तिच्या’ मृतदेहावरही केला बलात्कार

नागपूरच्या खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवाणी गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. महिलेसोबत ही घटना शेतात काम करत असताना घडली.

    नागपूर : उपराजधानी नागपुरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत नराधमांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. शेतात एकटी असलेल्या महिलेवर तीन जणांनी सामुहिक अत्याचार  (GangRape in Nagpur )केला. तिने विरोध केला असता आरोपींनी तिच्यावर कुऱ्हाडीने घाव घातला आणि त्यानंतरही न थांबत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी महिलेवर पुन्हा बलात्कार केला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    महिला शेतात होती एकटी

    नागपूरच्या खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवाणी गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. महिलेसोबत ही घटना शेतात काम करत असताना घडली.  35 वर्षीय महिला शेतात एकटीच होती, ती कापूस वेचण्याच काम करत होती. त्यावेळी जवळच्या शेतात कोणीही नव्हते.  दरम्यान गावातील रहिवासी दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील यांनी शेतात महिलेवर अत्याचार करु लागले. तिने विरोध केला असता,तिघांनी मिळून तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामुळे महिला गंभीर जखमी झाली. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेच्या मृतदेहावरच बलात्कार केला. या महिलेचा पती आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठीच आरोपींनी तिच्यासह हे भयानक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

    आरोपींना अटक

    काही वेळाने शेतातील महिलांना मृतदेह दिसल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून गावात चौकशी केली. यादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनीही आपला गुन्हा मान्य केला आहे.