डोंबिवलीत तरुणीवर गॅंग रेप, मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणीवर बलात्कार

या प्रकरणी पोलिसांनी दिनेश गडारी याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल राठोड अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे.

    डोंबिवली : तरुणीच्या मित्राला दारु आणण्यासाठी पाठवून तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी दोघांपैकी एक दिनेश गडारी याला अटक केली आहे. तर दिनेशचा साथीदार सुनिल राठोेड याचा शोध पोलीस घेत आहेत. डोंबिवली पूर्वेतील कुंभारखान परिसरात पिडीत तरुणी राहते. ती तिच्या एका मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. ती तिच्या राहते घर सोडण्याच्या तयारी होती.

    तिने तिचं सामन तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. १७ सप्टेंबरच्या संध्याकाळी पिडीत तरुणी आणि तिचा मित्र हे तिचे सामान पाहण्यासाठी गेले होते. या दोघांच्या ओळखीचा दिनेश गडारी आणि सुनिल राठोड हे दोघे घरी होते. या दोघांनी पिडीत तरुणाच्या मित्राला दारु आणण्याकरीता सांगितले. तिचा मित्र दारु आणण्यासाठी निघून गेला. तरुणी एकटीच घरी होती. याचा फायदा घेत दिनेश गडारी याने तरुणीवर बलात्कार केला. ती कशीबशी घराबाहेर निघाली. ती मदतीसाठी घराबाहेर निघून पळू लागली.

    तिचा पाठलाग करुन दिनेश गडारी याचा मित्र सुनील राठोड याने तिला एका रिक्षात कोबून धरले. रिक्षात तिच्यावर बलात्कार केला. तक्रार येताच विष्णूनगर पोलिसांनी एसीपी सुनिल कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे आणि महिला पोलीस अधिकारी मेघा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश गडारी याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल राठोड अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.