एसटी बस मधील प्रवासी महिलेचे 14 तोळे सोने लंपास करणारी टोळी जेरबंद

एसटी बस मधील प्रवासी महिलेचे १४ तोळे सोने लंपास करणाऱ्या हरियाणा राज्यातील टोळीस इंदापूर पोलिसांनी चाकूर रेल्वे स्टेशन (जि. लातूर) येथून बेड्या ठोकल्या आहेत.

    इंदापूर : एसटी बस मधील प्रवासी महिलेचे १४ तोळे सोने लंपास करणाऱ्या हरियाणा राज्यातील टोळीस इंदापूर पोलिसांनी चाकूर रेल्वे स्टेशन (जि. लातूर) येथून बेड्या ठोकल्या आहेत.
    सतिपकुमार मनपुरसिंग (वय ४० वर्षे रा. वार्ड नं.१४, बरवाला, जि. हिस्सार), राहूल धमेद्र (वय २३ वर्षे, रा. धम्तानसाहेब,ता. नरवाना, जि. जिंद), सुभाष फुलला (वय ४६ वर्षे, रा.६०९, हंसा पटटी, धम्तानसाहेब, ता. नरवाना, जि. जिंद), शिशपाल पुरिराम (वय ६५ वर्षे, रा. बहुतवाला,ता.जि. जिंद),राजेशकुमार पुर्ण सिंह (वय ३६ वर्षे, रा. हाउस नं.१३५, संदलाना, ता. बरवाला, जि. हिस्सार), विरेन्द्रकुमार रामस्वरूप (वय ४० वर्षे, रा.धम्तानसाहेब, ता नरवाना, जि. जिंद, राज्य- हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या संशियीत आरोपींची नावे आहेत.
    सविस्तर वृत्त असे की,५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी पावणे आठ ते दहा वाजण्याच्या दरम्यान कुर्डुवाडी ते डाळज प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी १४ तोळे सोन्याचे दागिणे चोरी केल्याची तक्रार अलका बबनराव खंडागळे (वय ६० वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी इंदापूर पोलिसात दिली होती. त्या अनुषंगाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने इंदापूर, टेंभुर्णी, कुर्डूवाडी, लातूर जिल्ह्यातील चाकूर पर्यंत शंभर पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक माहितीच्या आधारे चाकूर रेल्वे स्टेशन (जि. लातूर) येथून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या बांगड्या, अंगठी, गंठण, नेकलेस व ठुशी असे अंदाजे आठ लाख रुपयांचे १४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. आरोपी हे सराईत असून त्यांनी यापूर्वी पंजाब, हरियाणा,जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश,तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधील रेल्वे व बस मधील प्रवाशांची रोख रक्कम व दागिने चोरल्याचे पोलिसांनी सांगितले.
    सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, स.पो.नि योगेश लंगुटे, प्रकाश पवार,प्रकाश माने,पो.ह ज्ञानेश्वर जाधव, पो.ना सलमान खान,पो.ह नंदू जाधव, विशाल चौधर, मोहन आनंदगावकर, निलेश फडणीस, दिनेश चोरमले, गणेश डेरे, गजानन वानुळे, लखन झगडे,कुंभार यांनी केली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे हे करित आहेत.