
आगामी लोकसभा, विधानसभा तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी (Upcoming Elections) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी वेगवेगळी रणनिती आखली जात आहे.
मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी (Upcoming Elections) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी वेगवेगळी रणनिती आखली जात आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या पक्षात गँगस्टरला एन्ट्री दिली आहे.
गँगस्टर रामा गणिगा मांडवीकर उर्फ हरीश मांडवीकर याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश केला. आठवले यांच्या उपस्थितीत मुंबईत गँगस्टर मांडवीकर याने आरपीआयमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश होताच रामदास आठवले यांनी त्याच्यावर मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याची माहिती आहे.
मांडवीकर हा गँगस्टर असून, त्याच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहे. मटका किंग सुरेश भगत हत्या प्रकरणात मांडवीकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) साक्षीदारास कारागृहातून धमकावल्याप्रकरणी हरीश मांडवीकर याच्यासह चौघांना अटक केली होती.