यशोधरानगरात रात्रीचा थरार; गुंड शाकीर रज्जाकची लाकडी दांड्याने मारहाण करून हत्या

यशोधरानगर ठाण्यांतर्गत न्यू इंदिरामातानगरात रात्री साडेआठच्या सुमारास एका गुंडाची लाकडी दांड्याने मारून हत्या (Murder News) करण्यात आली. शाकीर रज्जाक उर्फ चाकू असे मृताचे नाव आहे.

    नागपूर : यशोधरानगर ठाण्यांतर्गत न्यू इंदिरामातानगरात रात्री साडेआठच्या सुमारास एका गुंडाची लाकडी दांड्याने मारून हत्या (Murder News) करण्यात आली. शाकीर रज्जाक उर्फ चाकू असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी राशीद अली व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध (Nagpur Crime) गुन्हा नोंदविला आहे.

    शाकीर उर्फ चाकूला चार ते पाच भाऊ आहेत. शाकीर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याला दोन पत्नी आहेत. तसेच तो कधी न्यू म्हाडा कॉलनी, तर कधी उप्पलवाडी, तर कधी न्यू इंदारानगरात राहायचा. पूर्वी त्याचे वडिलोपार्जित घर वनदेवीनगर येथे होते. चार ते पाच भाऊ असल्याने त्यांची परिसरात दहशत होती. गुरुवारी रात्रीला त्याचे आपल्या भावांसोबत भांडण झाले. या भांडणाच्या रागात त्याने वस्तीतील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

    शाकीर उर्फ चाकू व त्याच्या भावाच्या सततच्या हैदोसाला वस्तीतील लोक कंटाळले होते. राशीद व इतर दोन तरुणांनी त्याला विरोध करत तोडफोड करण्यास मनाई केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. या दरम्यान राशीद व त्याच्या साथीदारांनी चाकूवर हल्ला केला. जबर मारहाण करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. गंभीर जखमी अवस्थेत चाकूला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    शाबीरची प्रकृती चिंताजनक असल्याने ट्रामा केयर सेंटरला ठेवण्यात आले. उपचार सुरू असताना त्याने काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.