गणपत गायकवाड यांचा वर टिका करणारे माकडं, नक्की सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण काय म्हणाले…

इतर पक्ष असो की, मित्र पक्ष असाे. त्याने आपल्यावर टिका केली तर कोणाला सोडायचे नाही.

    कल्याण : कल्याणमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात एकीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर सडेतोड टिका केली आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या कामाची स्तूती केली आहे. गणपत गायकवाड हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. याचा अर्थ काय चांगल्या झाडावरती माकडं हे बोलून त्यांनी जीभ दाताखाली दाबली. याचा अर्थ असा की, गायकवाड यांच्यावर टिका करणाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माकडांची उपमा दिली आहे .

    कल्याण पूर्वेत भाजपाकडून पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमा दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर टिका केली. भाजप आमदार गायकवाड यांनी या आधी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली होती. गायकवाड हे सातत्याने त्यांच्यावर होत असलेल्या टिकेनंतर आता आणखीन आक्रमक झाले आहेत. भाजप पक्षाच्या कार्यक्रमात एकेक करुन सर्व मुद्याचा समाचार घेतला. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी देखील पक्ष कसा वाढेल यासाठी काय केले पाहिजे. आपल्यावर टिका होत असेल त्याचे प्रत्युत्तर चोखपणे दिले पाहिजे, कोणी पण असो. इतर पक्ष असो की, मित्र पक्ष असाे. त्याने आपल्यावर टिका केली तर कोणाला सोडायचे नाही. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

    आशा व्यक्त केली की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द पाळणार. पुढील काळात कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर भाजपचा बसणार. मात्र गायकवाड यांच्यावर झालेल्या टिकेनंतर भाजप आमदार गायकवाड यांची स्तूती केली. गणपत गायकवाड हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. याचा अर्थ काय चांगल्या झाडावरती माकडं ….. हे बोलून त्यांनी जीभ दाताखाली दाबली. याचा अर्थ असा की, गायकवाड यांच्यावर टिका करणाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना माकडांची उपमा दिली आहे. भाजपच्या कार्यक्रमात भाजप मंत्री आजी माजी आमदारांकडून शिंदे गटावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे टीकेची झोड उठवल्याने राजकीय वातावरण तापले आहे.