निरा येथे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरने घेतला पेट; घरातील साहित्य जळून खाक

निरा (ता.पुरंदर) येथे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरने (Cylinder Blast) पेट घेतल्याने एका व्यक्तीच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. सिलेंडर अचानक पेटल्याने घरातील कपाटानेही पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    निरा : निरा (ता.पुरंदर) येथे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरने (Cylinder Blast) पेट घेतल्याने एका व्यक्तीच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. सिलेंडर अचानक पेटल्याने घरातील कपाटानेही पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    निरा येथील ओमकार साळुंखे यांच्या घरात रात्रीचा स्वयंपाक सुरू होता. गॅस सिलेंडर संपल्याने त्यांनी नवीन सिलेंडर जोडला. त्यानंतर शेगडी सुरू केली. मात्र, दहा मिनिटांनी रेग्युलेटरमधून गॅस लीक झाला आणि याठिकाणी गॅसने पेट घेतला. ओमकार साळुंखे आणि त्यांच्यावर शेजारील लोकांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गडबडीत सिलेंडर आडवा झाला आणि घरातील कपड्यांपर्यंत त्याची आग गेली. पहिल्यांदा कपड्यांनी पेट घेतला. त्यानंतर शेजारील कपड्याचे कपाटही पेटले. यामध्ये कपडे कागदपत्रे, दागिने व रोख रक्कम जळून खाक झाली.

    दरम्यान, साळुंखे हे आचाऱ्याचे काम करतात. आगीत त्यांचं मोठ नुकसान झाले. कुमार गॅस एजन्सीच्या वतीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. आग लागल्यानंतर घरातील लोकांनी लगेच घराबाहेर पळ काढल्याने सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.