मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गॅसचा टँकर पलटी

मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय वाहिनीवर मेंढवण येथे भीषण अपघात. मुंबई-अहमदाबाद वहिनीवर गॅसचा टँकर पलटी झाला आहे. मेंढवण घाटातील तीव्र उतारावर भीषण अपघात झाला आहे. यामुळे मुंबई अहमदाबाद वाहिनीवरील वाहतूक मंदावली आहे.

    डहाणू :  मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय वाहिनीवर मेंढवण येथे भीषण अपघात. मुंबई-अहमदाबाद वहिनीवर गॅसचा टँकर पलटी झाला आहे. मेंढवण घाटातील तीव्र उतारावर भीषण अपघात झाला आहे. यामुळे मुंबई अहमदाबाद वाहिनीवरील वाहतूक मंदावली आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही.

    गॅस टँकरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर पुढे मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या टेंपोवर आदळून तो विरुद्ध दिशेला मुम्बई अहमदाबाद मार्गावर जाऊन पलटी झाला. तीव्र उतार असल्यामुळे मेंढवण येथील उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिस यंत्रणा देखील दाखल झाली आहे.