हे तुम्हाला माहित आहे का? गौतम अदानी यांचं 25 वर्षांपूर्वी झालं होतं अपहरण, एकदा मरता मरताही वाचले, जाणून घ्या काय कनेक्शन?

भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती अशी ओळख असलेल्या रिलायन्स ग्रुपच्या मुकेश अंबानी यांच्याशी होतेय. मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या जुन्या आयुष्यातील महत्त्वाचे जीवावर बेतणारे प्रसंग सांगितले आहेत. तुम्हालाही हे प्रसंग जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

  मुंबई– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) काळात उदय काळ अनुभवलेले उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. देशातील अनेक मोठ्या कंपन्या आणि विमानतळांचा कारभार हाती घेतलेल्या अंदानी ग्रुपच्या कंन्यांवर एकदम प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. हिंडेनबर्ग (Hindenburg) या अमेरिकन रिसर्च संस्थेच्या एका रिपोर्टमुळं गौतम अदानी यांची विश्वासार्हता सध्या पणाला लागली असल्याचं मानलं जातंय. काही दिवसांपूर्वी ज्या अदानींची गणना जगातील सर्वात श्रींमत व्यक्तीत नंबर 3 या स्थानी होत होती, त्यांचा तो क्रमांक या रिपोर्टमुळं खाली आला आहे. सध्या त्यांचं स्थान जागतिक पातळीवर सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या टॉप 10 मध्ये असल्याचं सांगण्यात येतंय.

  मात्र गौतम अदानी यांचा हा आत्तापर्यंतचा प्रवास नक्कीच सुखकर नव्हता. अनेक अडचणींचा धैर्यानं सामना करत ते या स्थानावर पोहचलेले आहेत. म्हणूनच आत्ता त्यांची स्पर्धा भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती अशी ओळख असलेल्या रिलायन्स ग्रुपच्या मुकेश अंबानी यांच्याशी होतेय. मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या जुन्या आयुष्यातील महत्त्वाचे जीवावर बेतणारे प्रसंग सांगितले आहेत. तुम्हालाही हे प्रसंग जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

  दोन प्रसंग ज्याचा अदानी यांनी केला उल्लेख

  गौतम अदानी यांनी त्यांच्या आयुष्यातील जीवावर बेतलेले दोन प्रसंग या मुलाखतीत सांगितले आहेत. या प्रसंगांत त्यांच्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकलं असतं अशी शक्यता होती. केवळ नशिबाची साथ होती, म्हणूनच ते या दोन्ही प्रसंगांतून वाचू शकले, असंही त्यांनी या मुलाखतीत त्यांनी मान्य केलेलं आहे. कुठल्याही मोठ्या पातळीवर जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात अनेकदा मोठे संघर्ष असतात, हेच यातून दिसून येतंय. काय आहेत हे दोन्ही प्रसंग हेही जाणून घेऊयात.

  मुंबईवर 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी मृत्यू जवळून पाहिला

  मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी जेव्हा अफजल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यावेळी गौतम अदानी यांनी त्यांचा मृत्यू जवळून पाहिला असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलेलं आहे. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी दहशतवाद्यांनी मंबईतील ताज हॉटेल वेठीला धरलेले होते. त्यावेळी त्या हॉ़टेलमध्ये गौतम अदानीही उपस्थित होते. याच ताज हॉटेलमध्ये दहशतावाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेकांचा त्यांचे प्राण गमवावे लागले होते. या सगळ्या हल्ल्यात अदानी यांचे प्राण वाचले.

  1998 साली झाले होते अपहरण

  तुम्हाला याची कल्पना नसेल, पण 1998 साली अदानी यांचं बंदुकीच्या टोकावर अपहरण करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर त्यांना सोडण्यासाठी 15 कोटींची खंडणीही मागण्यात आली होती. 1 जानेवारी 1998 रोजी अहमदाबादच्या कर्णावती क्लबमधून बाहेर येताना त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण झालं त्यावेळी अदानी यांच्यासोबत त्यांचे नीकटवर्तीय शांतीलाल पटेल हेही होती. या दोघांना अज्ञातस्थळी नेण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांचं अपहरण झालं आणि शनिवारी त्यांची सुटका करण्यात आली होती. या अपहरणाचं कनेक्शन उ. प्रदेश आणि बिहारमधील गुन्हेगारी टोळ्यांशी असल्याचं सांगण्यात येतंय. बबलू श्रीवास्तवच्या गँगनं हे अपहरण केलं होतं, अशी माहिती आहे. या सगळ्या अपहरण नाट्यातून त्यांची सुटका नेमकी कशी झाली याचं गूढ मात्र अद्याप कायम आहे. पोलिसांनी त्यांना सोडवलं, की ते स्वत: पळून आले ती या टोळीला 5 कोटींची खंडणी देण्यात आली, अशा वेगवेगळ्या चर्चा रंगतायेत. ही रक्कम दुबईतल्या इरफान गोगा याच्यापर्यंत पोहचल्याचीही चर्चा आहे.

  या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 2009 साली आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं होतं. मात्र 2018 साली या सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय. पुराव्यांअभावी आरोपींची निर्देष मुक्तता केल्याचंही सांगण्यात येतंय.