गावठी बनावटीचे पिस्तुल अन् सात जीवंत काडतुस जप्त, शिरवळ पोलीसांची कारवाई; आरोपीला अटक

पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना व्यक्तीच्या हालचालीवरून त्याच्यावर संशय आला आणि त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व सात जीवंत काडतुसे मिळून आली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

    सातारा : पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना व्यक्तीच्या हालचालीवरून त्याच्यावर संशय आला आणि त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व सात जीवंत काडतुसे मिळून आली असून, समीर मोहम्मद इसाक खान (वय-३२) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत दि १९ रोजी मॉर्निंग स्कॉडला पेट्रोलीग दरम्यान व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद जाणवल्याने ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व एकुण सात जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मॉर्निंग स्कॉड करीता शिरवळ पोलीस ठाणेचे अंकुश गाडर्डी यांना नेमणेत आलेले होते. मॉर्निंग स्कॉड दरम्यान त्यांना पुणे ते सातारा जाणारे हायवे रोडलगत असलेले महापारेषण कंपनी समोर सर्व्हिस रोडलगत एक व्यक्ती त्याच्याकडील मोटार सायकलसह मिळून आला होता. त्याच्याकडे प्रथमदर्शनी विचारपुस केली असता त्याच्या हालचाली व हावभाव संशयीत जाणवल्याने गार्डी यांनी याबाबत पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांना कल्पना दिली.

    शिरवळ पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार जितेंद्र शिदे, पोलीस हवालदार सचिन वीर, तसेच मोझर यांनी सदर व्यक्तीकडे अधिक विचारपुस करुन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एकूण सात जिवंत काडतुसे मिळुन आली. समीर मोहम्मद इसाक खान (वय-३२) याने पिस्टल व जीवंत काडतुसे हि बेकायदा बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्यानुसार त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचा पुढील तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.