आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांचा मुंख्यमंत्री ठाकरेंना फोन

आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून केली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय.  नाराज एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

    मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

    अशातच आता आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून केली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय.  नाराज एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

    शिंदे सध्या 35 आमदारांसह सुरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरचं शिवसेनेचं  नाव हटवलं आहे. यामुळे शिंदेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, असं बोललं जातंय. महाविकास आघाडी सरकार शिंदेंच्या बंडाळीमुळे सरकार पडण्याची शक्यता आहे. यातच आता एकनाथ शिंदे गटनेते पदावरुन मागे हटणार नसून त्यांच्याकडे 35 आमदार असल्यानं गटनेतेपदावरुन त्यांना हटवलं जाऊ शकत नाही, असा कयास बांधला जातोय. तर शिवसेनेकडे फक्त चौदा आमदार राहिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंचा गट, अशी परिस्थिती सध्या शिवसेनेत निर्माण झाली आहे.