पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन; अलिबागचे पांढरे सोने झळाळणार

महाराष्ट्रात होणाऱ्या कांद्याच्या विविध प्रकारांपैकी अलिबागच्या पांढऱ्या कांद्याने आपले वेगळे वैशिष्ट्य जपले आहे. मोत्यासारखा पांढराशुभ्र, मोदकासारखा आकर्षक आकार, गोड चवीचा तसेच विविध औषधी गुणधर्मांनी युक्त म्हणून या कांद्याची ओळख आहे. अलीकडील काळात ग्राहकांकडून म्हणूनच या कांद्याला बेहद पसंती मिळू लागली आहे.

    अलिबाग : १०० वर्षांच्या ही आधीपासून लागवडीची परंपरा जोपासलेल्या अलिबागच्या गोड पांढरा कांद्याचा (White Onion Cultivation) सरकारच्या भौगोलिक मानांकन (Geographic Classification) (जीआय-GI) यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पांढऱ्या कांद्याला देशासह जागतिक बाजारपेठेत (World Market) स्थान मिळवणे शक्य होणार आहे. त्यामुळे अलिबाग (Alibaug) तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

    महाराष्ट्रात होणाऱ्या कांद्याच्या विविध प्रकारांपैकी अलिबागच्या पांढऱ्या कांद्याने आपले वेगळे वैशिष्ट्य जपले आहे. मोत्यासारखा पांढराशुभ्र, मोदकासारखा आकर्षक आकार, गोड चवीचा तसेच विविध औषधी गुणधर्मांनी युक्त म्हणून या कांद्याची ओळख आहे. अलीकडील काळात ग्राहकांकडून म्हणूनच या कांद्याला बेहद पसंती मिळू लागली आहे.

    अलिबाग तालुक्यामध्ये सध्या प्रामुख्याने खंडाळा, वाडगाव, वेश्वी, कार्लेखिंड यासह अन्य काही भागांमध्ये पांढरा कांद्याची लागवड केली जाते. पांढऱ्या कांद्याची लागवड सुमारे २३० हेक्टरवर केली जाते. बॉम्बे प्रेसिडेन्सी – कुलाबा गॅझेटच्या (Bombay Presidency- Colaba Gazzete)  सन १८८३ च्या मूळ प्रतीत आणि सन २००६ च्या ई-बुक आवृत्तीत अलिबागमध्ये पांढरा कांदा लागवडीखाली असल्याचे ऐतिहासिक संदर्भ देण्यात आले आहेत. या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रायगड कृषी विभाग, पुण्यातील जीएमजीसी कंपनीचे प्रमुख गणेश हिंगमिरे यांनी एकत्रित प्रयत्न केले.