दैनंदिन वापरातील आल्याच्या दरात चार पटीने वाढ, बाजारात आल्याची कमतरता

नेहमी बंगळुरूमधून येणारे आले हे तुरळक प्रमाणात येत असल्याने बाजारात आल्याची कमतरता निर्माण झाली आहे.

    आल्याच्या दरात वाढ : आले हे महत्वाचे मसाल्याचे पीक आहे. आल्याची लागवड ही मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते. पीक उष्ण हवामानात चांगले येते. आले ही एक वनस्पती आहे. तिचे मूळ हे सुगंधी असल्याने मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जाते. आल्याचा (अद्रक) वापर हा चहा मध्ये नेहमीच केला जातो, तसेच खोकल्या सारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. मात्र, याच आल्याच्या दरामध्ये चारपट वाढ झाली आहे. आल्याची आवक वाढल्यामुळे आल्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. नेहमी बंगळुरूमधून येणारे आले हे तुरळक प्रमाणात येत असल्याने बाजारात आल्याची कमतरता निर्माण झाली आहे.

    एक किलो आल्याच्या दराने पाव किलो आले खरेदी करावे लागत आहे. किरकोळ बाजारात पाव किलो आल्यासाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत घाऊक बाजारात आले ९० ते ११० रुपये किलो आहे. त्यातही कोवळे आले असल्याने ते लवकर खराब होत आहेत. परिणामी, किरकोळ बाजारात आले १८० ते २२० रुपये आणि त्यातही चांगले आले हे २४० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आले खरेदी दारांना आले खरेदी करताना कमी प्रमाणात आले खरेदी करावे लागत आहे.

    यासंदर्भात एका विक्रेत्याने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी तो म्हणाला की जुन्या अद्रकचा भाव हा जास्त आहे. दिवसेंदिवस आल्याच्या दरामध्ये वाढ होत चालली आहे. त्यानंतर दुसऱ्या विक्रेत्याने सांगितले की आता अद्रकचे भाव वाढले आहेत.