‘संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की…’; गिरीश महाजन यांचा टोला

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. ‘संजय राऊत हे रोज भांग पिऊन बोलतात की आणखी कुठली नशा करतात हा खरंतर संशोधनाचा विषय आहे. या नशेत ते काहीही बोलू शकतात’, असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत हे दररोज माध्यमांसमोर जात विविध वक्तव्यं करत असतात. त्यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले, ‘संजय राऊत यांच्याविषयी रोज रोज बोलायला आमच्याकडे शब्दच नाहीत. ते रोज भांग पिऊन बोलतात की आणखी कुठली नशा करतात? आम्हाला माहित नाही. ते कोणत्या नशेत बोलतात हा संशोधनाचा विषय आहे. ते काहीही बोलू शकतात, शिवीगाळ करू शकतात. कोर्टाला, न्यायव्यवस्थेला शिव्या देऊ शकतात. निवडणूक आयोगाला शिव्या देऊ शकतात कारण ते स्वयंभू आहेत.

…पण त्यांना मोकळं सोडलंय

आम्ही संजय राऊतांपुढे हात टेकलेले नाहीत पण त्यांना मोकळं सोडलंय. त्यांना रोज उत्तर कोण देईल? ते ज्या भाषेत बोलतात ती संस्कृती आमची नाही. ते किती शिवराळ भाषेत बोलतात हे माध्यमांना माहित आहेतच. त्यामुळे ते कुठली नशा करतात हाच खरा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्याबाबत बोलायला शब्द नाहीत

संजय राऊत हे माध्यमांशी दररोज संवाद साधत असतात. त्यावर विचारले असता महाजन म्हणाले, ‘संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर रोज-रोज काय बोलायचं ना? आमच्याकडे काहीही शब्द नाहीत.