स्वतःचं सोडायचं आणि दुसऱ्याच्या पाठीमागे पळायचं हा उद्योग का करायचा? विरोधकांना दुसरं काम नाही – गिरीश महाजन

न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा तपास सुरू आहे आणि यातून निश्चित मार्ग निघेल. ठरवलेल्या कालावधीतून निश्चितपणे चौकशी करून यातून योग्य तो मार्ग काढू

    पुणे : चौंडीमध्ये गेल्या १८ दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत धनगर शिष्टमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे आणि जवळपास मार्ग निघालेला आहे. उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढणार आहोत. विरोधकांना दुसरं काम नाही त्यामुळे त्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही तुमचे लोक सांभाळा, तुम्ही व्यवस्थित रहा. स्वतःचं सोडायचं आणि दुसऱ्याच्या पाठीमागे पळायचं हा उद्योग का करायचा? त्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा आम्ही आमच्या पक्षाचं बघून घेऊ. पंकजा मुंडे आमच्या सोबत आहेत असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

    चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलेला आहे. उगीच काहीतरी शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करायचा आणि यातून विपर्यास निर्माण करायचा हे योग्य नाही. मराठा आरक्षणाची मुदत संपलेली नाही, तुम्ही असं म्हटल्यामुळे मला घाबरल्यासारखा झालं. मराठा आरक्षणासाठी एक समिती नेमली आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा तपास सुरू आहे आणि यातून निश्चित मार्ग निघेल. ठरवलेल्या कालावधीतून निश्चितपणे चौकशी करून यातून योग्य तो मार्ग काढू असे गिरीश महाजन म्हणाले.

    बारामती लोकसभा उमेदवाराचं माझ्या हातामध्ये नाही या गोष्टीत केंद्रीय निवड समिती ठरवेल. अजित पवार आमच्या सोबत आहेत त्यांचे चाळीस आमदार देखील आमच्या सोबत आहेत. बारामतीसहित महाराष्ट्रातील लोकसभेच्या महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आम्ही घेऊ आणि पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधानपदी विराजमान करू बारामतीकरांचा माझ्या म्हणण्यावर किती विश्वास आहे? पण यावेळी आम्ही विरोधकांना ज्यावेळी क्लीन बोल्ड करू लोकसभेच्या शंभर टक्के जागा आम्ही जिंकू असे गिरीश महाजन यांनी सांगितले