आधी जरांगे पाटील यांच्या मागण्या वेगळ्या होत्या, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले?- गिरीश महाजन

आता ते मागणी करत आहेत संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा.

    गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद : महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी अनेकांवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन म्हणाले, आमचा प्रयत्न आहे बैठकीत तोडगा निघावा, माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे त्यांनी उपोषण सोडावे. त्यांनी पाणी सोडले आहे, तब्येत खराब होत आहे. त्यांचे शिस्टमंडळ आले होते त्यात चर्चा झाली होती, तात्काळ जीआर काढला तर टिकणार नाही. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, सरसकट आरक्षण तांत्रिक दृष्ट्या टिकणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. उपोषण सोडले नाही, तर उगाच त्यांच्या जीवाला धोका होईल, परमनंट सोल्यूशन काढण्यासाठी शासनाला त्यांचा वेळ द्यावा असे गिरीश महाजन म्हणाले.

    पुढे गिरीश महाजन म्हणाले की, सुरुवातीला त्यांची मागणी वेगळी होती आता त्यांची मागणी वेगळी आहे. आधी त्यांनी मराठवाड्यामधील मराठा समाज वेगळा आहे असं सांगितलं होतं. कुणबी समाज वेगवेगळ्या भागात आहे, मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. आता ते मागणी करत आहेत संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा. परंतु हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही असे गिरीश महाजन म्हणाले. हे अश्यक्य आहे, कोर्टातूनच आरक्षण घ्यावे लागेल, सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही. पहिल्याच दिवशी ते फेटाळलं जाईल त्यासाठी वेळ दिला पाहिजे असे गिरीश महाजन म्हणाले.

    गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यावर सगळे लोक हसायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल ते शिलक्या भाषेत आणि खालच्या भाषेत बोलतात. त्यांच्याकडे दोन-चार लोक राहिले आहेत तो विषय वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल उद्धव ठाकरे बोलत होते तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन आल्यानं ते असं बोलत आहे त्यांच्या मागे कोणी राहिलं नाही म्हणून ते अस्वस्थ आम्हाला त्यांच शारीरिक व्यंग काढायचं नाही. पंतप्रधान यांच्यावर त्यांनी काय बोलावं? त्यांचेच पंतप्रधान होण्याबाबत बॅनर लागले. विरोधी पक्षात आहे म्हणून त्यांना बोलावं लागतं पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? विश्वासार्हता असायला पाहिजे? मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले?