मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, रेल्वेकडे कारवाईची मागणी!

मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका मुलीचा अश्लील डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी अचानक तिच्या सीटवरून उठते आणि डान्स करायला सुरुवात करते.

  आजकाल लोक प्रसिद्ध होण्याच्या हव्यासापोटी काहीही करत आहेत. गेल्या काही दिवसापासुन मेट्रोमध्ये लोकलमधले ( Metro Train Viral Video) काही ना व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी काही लोकं कुठल्याही थराला जातात. यावरुन ट्रोल करण्यात येत असलं तरीही यांना त्याची त्यांना अजिबात काळजी नसते. असाच एक व्हिडिओ सध्या वेगानं व्हायरल होता आहे. मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये एक मुलगी भोजपुरी गाण्यावर डान्स (Dancing In Mumbai Local) करत आहे.

  मुंबई लोकल मधील व्हिडिओ व्हायरल

  मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका मुलीचा अश्लील डान्स करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती अचानक तिच्या सीटवरून उठते आणि डान्स करायला लागते. मुलीच्या डान्स मूव्ह्स शेजारी बसलेल्या प्रवाशांनाही लाजवतात. मुलीच्या डान्सने प्रवासी अस्वस्थ होऊन उठून निघून जात आहेत.

  इंटरनेटवर खळबळ माजवणाऱ्या या डान्स रीलबाबत एका यूजरने रेल्वेकडे तक्रार केली आहे. ज्याला रेल्वेच्या एक्स हँडलने प्रतिसाद दिला आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाने मध्य रेल्वे सुरक्षा विभागाला या घटनेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सोशल मीडिया यूजर्सनीही डान्स रीलवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वापरकर्त्यांनी या डान्स रीलचे वर्णन ‘क्रिंज कंटेंट’ असे केले आहे.

  युझर्सने व्यक्त केला संताप

  ही पोस्ट शेअर केल्यापासून जवळपास दहा लाख वेळा पाहिली गेली आहे आणि सात हजार लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर टिप्पणी करताना, एका युझरने म्हटले की, “सार्वजनिक ठिकाणी अशा अश्लील क्रियाकलापांना परवानगी देऊ नका… रेल्वेने सिस्टममध्ये काही मर्यादा राखली पाहिजे.” आणखी एका युजरने म्हटले की, “ट्रेन आणि मेट्रोमध्ये अशा प्रकारची अश्लीलता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा अश्लील नृत्य आणि अश्लील कृत्यांवर कोणी कारवाई का करत नाही?”