student molested by teacher

    पुणे : पुणे स्टेशन परिसरातील पीएमपीएल बसस्टॉपवर थांबलेल्या एका तरुणीची अज्ञाताने छेडछाड काढल्याची घटना घडली. तरुणी बसमध्ये बसत असताना त्या तरुणाने तरुणीला जबरदस्तीने मोबाईल क्रमांक लिहीलेली एक चिठ्ठी हातात देऊन फोन करण्यास धमकावल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तरुणीला अ‍ॅसिड टाकण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी १९ वर्षीय पिडीत तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पीएमटी बस स्टॉपला थांबली

    त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी वडगाव शेरी परिसरात राहण्यास आहे. दरम्यान, तरुणी बंडगार्डन भागात तिच्या आईसोबत आली होती. ती घरी जाण्यासाठी रात्री साडेनऊच्या सुमारास पुणे स्टेशन येथील पीएमटी बस स्टॉपला थांबली होती. तेव्हा तो आरोपी तिच्याजवळ आला. त्याने तरुणीकडे मोबाईल क्रमांक देण्याची मागणी केली. पण, तिने मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला.

    फोन न केल्यास अॅसिड टाकण्याची धमकी

    त्यानंतर त्याने तरुणीचा पाठलाग केला. तरुणी वडगा‌व शेरीकडे जाणारी बस आल्यानंतर आईसोबत बसमध्ये बसत असताना त्या तरुणाने तिचा हात जबरदस्तीने पाठीमागून ओढत तिच्याजवळ असलेल्या साहित्यात त्याचा मोबाईल क्रमांक लिहीलेली चिठ्ठी टाकली व फोन करण्यास सांगितले. फोन न केल्यास अॅसिड टाकण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.