मित्रांसोबत दारु पार्टीला गेली मुलगी, बिल्डिंगवरुन पडली आणि झाला मृत्यू, 16 वर्षांच्या मुलीचा गेला जीव

काही मित्रांसोबत एका पडक्या बिल्डिंगमध्ये दारु पार्टीसाठी गेलेल्या 16 वर्षांच्या मुलीला बिल्डिंगवरुन पडून मृत्यू झालाय. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

    नवी मुंबई : काही मित्रांसोबत एका पडक्या बिल्डिंगमध्ये दारु पार्टीसाठी गेलेल्या 16 वर्षांच्या मुलीला बिल्डिंगवरुन पडून मृत्यू झालाय. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

    अपघात की घातपात ?

    बेलापूरच्या स्केटर 15 मध्ये असेलल्या डी मार्टच्या बाजूला असलेल्या पडक्या बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला. ही अल्पवयीन मुलगी तिच्या काही मित्रांसोबोत या बिल्डिंगमध्ये दारु पार्टी करण्यासाठी गेली होती. हे सगळेजण सातव्या मजल्यावर बसले होते. दारुप पार्टीच्या वेळी तोल जाऊन ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर या मुलांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क साधला होता. डी मार्टमध्ये कामाला असलेला एक तरुणही या पार्टीत सहभागी होता. मुलांनी या मुलीलाही दारु पाजली होती, असा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी करण्यात येतेय. ही मुलगी पनवेलची रहिवासी होती.

    मुलगी बॉयफ्रेंडसोबत होती

    या १६ वर्षांच्या मुलीचा २९ वर्षांचा बॉयफ्रेंड होता. घरच्यांनाही त्याची कल्पना होती. लग्नाचं वय झाल्यानंतर या दोघांचं लग्न लावून देण्यात येणार होतं. बुधवारी रात्री ती तिच्या मित्राच्या घरी मुक्कामी होती. त्यानंतर गुरुवारी ते त्या पडक्या बिल्डिंगमध्ये दारु पिण्यासाठी गेल्याचं सांगण्यात येतंय.