breaking news

बोरिवलीतल्या (Borivali Building Collapsed)  साईबाबा नगरमधील गितांजली नावाची इमारत कोसळली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.

    मुंबई : बोरिवलीत (Borivali) ४ मजली इमारत कोसळली आहे. बोरिवलीतल्या (Borivali Building Collapsed)  साईबाबा नगरमधील गितांजली नावाची इमारत कोसळली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलिसांकडून आणि अग्नीशमन दलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बिल्डींगमध्ये १२ ते १५ जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. ही इमारत खूप जुनी असल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीत काही कुटुंब वास्तव्याला असल्याची माहिती समोर येत आहे.

    मुंबईत वारंवार इमारत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा होत असताना, लोक मानवी मनोरे उभे करत असताना या दिवशी एक मनोरा एक  इमारत कोसळण्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.