Give a special package of help to the farmers affected by heavy rains - MP Bhawantai Gawli's demand to the Chief Minister

पावसामुळे शेतक-यांचा खरीप हंगाम पाण्यात गेला असून सरकारने विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना मदतीचे विशेष पॅकेज (Special package) देण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी (MP Bhawantai Gawli) यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (Chief Minister Eknathji Shinde) यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.

    यवतमाळ : गेल्या पंचविस दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) विदर्भातील शेतक-यांची (Farmers in Vidarbha) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे कापूस, सोयाबिन सह सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतक-यांचा खरीप हंगाम पाण्यात गेला असून सरकारने विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना मदतीचे विशेष पॅकेज (Special package) देण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी (MP Bhawantai Gawli) यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (Chief Minister Eknathji Shinde) यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.

    गेल्या काही वर्षापासून यवतमाळ जिल्हयात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मागीलवर्षी सुध्दा परतीच्या पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. दुसरीकडे पिक विमा कंपणीने (Crop Insurance Company) सुध्दा मोजक्याच शेतक-यांना पीक विम्याचा लाभ दिला होता. आता तीच परीस्थिती खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच विदर्भात आली आहे. गेल्या पंचविस दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने कापूस, सोयाबिन तसेच इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासोबतच पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने भाव गगनाला भिडले आहे. शेतात पाणी साचल्याने तसेच नदी, नाले काठची शेती तर खरडून निघाली आहे. अजुनही पाऊस न थांबल्याने आता खरीप हंगामात काहीच उत्पन्न होण्याची शक्यता दिसून येत नाही.

    यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील (Yavatmal Washim Lok Sabha Constituency) अनेक शेतक-यांनी तसेच पदाधिका-यांनी खासदार भावनाताई गवळी यांना भ्रमणध्वनी वर संपर्क साधून आपबिती सांगीतली. खासदार भावनाताई यांनी सुध्दा या तक्रारीची दखल घेत शनिवारी दुपारी १ वाजता बाभूळगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतीची (Heavy rain affected agriculture in Babhulgaon taluka ) पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे शेतक-यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून विदर्भाला मदतीचे विशेष पॅकेज देण्याची मागणी सुध्दा केली आहे.

    शेतीची पाहणी करणार

    यवतमाळ जिल्हयात अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खासदार भावनाताई गवळी दिनांक १३ ऑगष्ट रोजी यवतमाळ जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. दुपारी १ वाजता भावनाताई गवळी बाभूळगाव परीसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी करणार आहे. याव्यतिरीक्त प्रशासकीय अधिका-यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ ऑगष्ट रोजी यवतमाळ येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून त्या वाशिमकडे रवाना होणार आहे.