मंत्री छगन भुजबळ यांचं मोठं विधान म्हणाले, ‘ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय द्या’

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात पेटला आहे. यावरून आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मार्ग कसा निघाणार यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून ओबीसीमध्ये (OBC) समावेश होतोय का हे पाहावे लागणार आहे.

    नाशिक : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात पेटला आहे. यावरून आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मार्ग कसा निघाणार यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून ओबीसीमध्ये (OBC) समावेश होतोय का हे पाहावे लागणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे.

    मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यासंदर्भात छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण फक्त 17 टक्क्यांत उरलेला आहे. 17 टक्क्यांमध्ये 400 जाती आहेत. यामुळे सगळ्यांची अडचण होईल. 50 टक्क्यांचा कॅप ओलांडून दहा टक्के ओपनला वाढवलेले आहे. भारत सरकारने आणखी दहा टक्के वाढवून त्यात मराठा ओबीसींचे आरक्षण फक्त 17 टक्के समाजासह पटेल, कापू, जाट यांना आरक्षण द्या म्हणजे सगळ्यांचा प्रश्न मिटेल.

    पुन्हा तोंडाला पाने पुसली जाणार

    मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. 17 टक्क्यात 54% ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही. कोणाच्याच वाट्याला काही येणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या सगळ्यांसह विरोधी पक्षाने मत मांडले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा न येता मराठा समाजाला कसा न्याय देता येईल हे बघितले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.