“सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या”, कुणबी जात प्रमाणपत्रावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता? जाणून घ्या ‘ही’ 3 कारणे

आज शिष्टमंडळ सरकारची भेट घेणार आहे. मात्र फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळल्यामुळं अन्य राज्यातील मराठ्याचे काय? यामुळं मराठवाड्यातील मराठा व उर्वरित मराठा असा वाद निर्माण होणार का? किंवा कुणबी विरुद्ध मराठा तसेच मराठा विरुद्ध ओबीसी असा देखील वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील ११ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणला बसले आहेत. जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटताहेत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. विरोधी पक्षातील नेत्यांनीसुद्धा या आंदोलनाला भेट देऊन, सरकारच्या लाठीचार्जवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, सरकारने मराठवाड्यातील निजामच्या काळात ज्यांच्या दाखल्यावर कुणबी असा उल्लेख आहे, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. पण सरसकट मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली असून, यासाठी त्यांचे आज शिष्टमंडळ सरकारची भेट घेणार आहे. मात्र फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मिळल्यामुळं अन्य राज्यातील मराठ्याचे काय? यामुळं मराठवाड्यातील मराठा व उर्वरित मराठा असा वाद निर्माण होणार का? किंवा कुणबी विरुद्ध मराठा तसेच मराठा विरुद्ध ओबीसी असा देखील वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (give kunbi certificate to all marathas controversy likely to arise from kunbi certificate what are the reasons)

  मराठवाड्यातील मराठा व उर्वरित मराठा वाद

  दरम्यान, वंशावळीत ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल, त्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ठरवले होते. परंतु, मनोज जरांगे यावर समाधानी नसल्याचे पाहायला मिळाले, त्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारने जो अध्यादेश काढला आहे, तो फक्त कुणबी नोंद असलेल्यांना आरक्षणांचा फायदा मिळणार आहे. त्यामुळं मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्याचे काय? त्यांना फायदा मिळणार नाही. त्यामुळं आगामी काळात उर्वरित मराठे आक्रमक होण्याची शक्यता असून,  मराठवाड्यातील मराठा व उर्वरित मराठा असा वाद निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

  कुणबी विरुध मराठा?

  दुसरीकडे सरकारने जीआरमध्ये स्पष्ट म्हटलंय की, निजामच्या काळात ज्यांच्या दाखल्यावर कुणबी असा उल्लेख आहे, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि त्यानाच आरक्षणाचा फायदा होणार आहे. परंतू मराठवाडा वगळता असा जात प्रमाणापत्रावर असा उल्लेख नाहीय. त्यामुळं जे कुणबी नाहीत, त्यांच्याकडून आम्हालाही कुणबीत समाविष्ट करुन घेण्याची मागणी होत आहे. पण इतिहास पाहता, जे ९६ कुळी मराठा आहेत, त्यांनी कुणब्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली असं कुणब्यांचे म्हणणे आहे. तसेच जेव्हा राज्यात मोर्चे निघाले तेव्हा आम्हाला गृहित धरले नाही किंवा आम्हाला महत्त्व दिले नाही, असं कुणब्यांनी म्हटलंय. आणि आता आरक्षणाचा फायदा मिळतोय, तेव्हा तुम्हाला कुणब्याचे नाव हवे आहे?  असं कुणब्यांनी म्हटलंय. त्यामुळं आगामी काळात कुणबी विरुद्ध मराठा असा वाद होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

  मराठा विरुद्ध ओबीसी? 

  मराठा आरक्षणावर जेव्हा मोर्चे व आंदोलनं निघतात, तेव्हा सतत मराठ्यांना ओबीसींतून आरक्षण द्या, अशी मागणी होतेय. आता देखील अशी मागणी होत आहे. सध्या ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. यात विविध घटक व पोटजाती आहेत. पण जर ओबीसींचे आरक्षण टक्केवारी वाढवून दिली तर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्यास किंवा त्यांना ओबीसीत समावून घेण्यास काही हरकत नसल्याचं ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. मात्र याला ओबीसी नेत्यांकडून प्रचंड विरोध झाला. सध्या मराठ्यांची देखील ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी होतेय. परंतू आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण आमच्यातून मराठ्यांना आरक्षण कशाला? असं ओबीसी नेत्यांने म्हटलं आहे. त्यामुळ भविष्यात मराठ विरुद ओबीसी असा देखी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जातेय.

  जरांगेंचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
  सरकारकडून अर्जुन खोतकर हे GR घेऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना GR वाचून दाखवला परंतु यावर मनोज जरांगे यांनी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वंशावळीनुसार कुणबी प्रमाणपत्र न देता, सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. यासाठी आज आमचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईसुद्धा जाईल, असेही ते म्हणाले. त्यामुळं आज तरी जात प्रमाण पत्रावर काही तोडगा निघणार का, हे पाहवे लागेल.