
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे योगदान मोठे आहे. खेड (जि. पुणे) येथे हुतात्मा राजगुरु यांच्या असलेल्या जन्मस्थळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मारकाला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
मुंबई– अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) अनेक महत्वाचे निर्णय व घोषणा होत आहेत. सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde fadnavis government) पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, एकिकडे सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप यावरुन जोरदार खडाजंगी सुरु आहे. तर आज विरोधकांनी कृषीमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध केला. खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. तर आत सभागृहात शितल म्हात्रे मॉर्फ व्हीडिओ फोटो प्रकरणी सभागृहात गदारोळ झाला असून, दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले होते.
राजगुरुंच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या…
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे योगदान मोठे आहे. खेड (जि. पुणे) येथे हुतात्मा राजगुरु यांच्या असलेल्या जन्मस्थळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मारकाला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतीकारकांनी बलिदान दिले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे बलिदान तर खूप मोठे आहे. नवीन पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे मूळगाव असणाऱ्या खेड (जि. पुणे) येथे त्यांच्या जन्मस्थळाला स्मारक उभारण्यात आले आहे.
राज्य सरकारने पाठपुरावा करावा
दरम्यान, हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे बलिदान तर खूप मोठे आहे. नवीन पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून राज्य सरकारने पाठपुरावा करावा. तसेच हे स्मारक दुर्लक्षित झाले आहे. या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. तरी राज्य सरकारने पाठपुरावा करुन हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याची मागणी अजित पवार यांनी केली.