दिव्यांग व्यक्तींना आत्मसन्मान द्या, तरच… : जयंत पाटील

दिव्यांग व्यक्तीही समाजाचा मुख्य घटक आहे. दिव्यांग व्यक्तींना वेग-वेगळ्या पध्दती ने आधार आणि आत्मसन्मान द्या.तरच त्यांच्यामध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो असा विश्वास माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

    इस्लामपूर : दिव्यांग व्यक्तीही समाजाचा मुख्य घटक आहे. दिव्यांग व्यक्तींना वेग-वेगळ्या पध्दती ने आधार आणि आत्मसन्मान द्या.तरच त्यांच्यामध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो असा विश्वास माजी मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

    वाळवा पंचायत समिती व भारतीय कृत्रिम अंग निर्माण (एलिम्का) कानपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवा तालुक्यातील ३२९ दिव्यांगांना तीन चाकी सायकल, श्रवण यंत्रे, आधार काठीसह अद्यावत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.