आम्हालाही घरे द्या! झाेपडपट्टीवािसयांचा पालकमंत्र्यांना घेराव

गेल्या आठवड्यात अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असल्याचे जाहीर केले होते. यावर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार जरी झाला असेल तरी सत्ताधारी मंत्र्यांना या निर्णयाचा त्यांच्या विरोधात तोंड देण्याची नामुष्की आल्याचे उदाहरण लासलगाव येथे पहावयास मिळाले

    लासलगाव : आमदारांना घरे मग आम्हाला का नाही?असा पालकमंत्री छगन भुजबळांना लासलगाव येथे गाडी अडवत गाडीला घेराव घालू संजय नगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनी सवाल केला.

    गेल्या आठवड्यात अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असल्याचे जाहीर केले होते. यावर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार जरी झाला असेल तरी सत्ताधारी मंत्र्यांना या निर्णयाचा त्यांच्या विरोधात तोंड देण्याची नामुष्की आल्याचे उदाहरण लासलगाव येथे पहावयास मिळाले.

    पालकमंत्री छगन भुजबळ हे मतदार संघाच्या दौर्‍यावर लासलगाव येथे शिलाई मशीन वाटप व रस्ता सुधारणा करणे कामाच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर नाशिककडे जाण्यासाठी निघाले असता लासलगाव येथील संजय नगरमध्ये राहणाऱ्या झोपडीतील नागरिकांनी गाडी अडवत भुजबळांच्या गाडीला घेराव घातला. आम्हीसुद्धा तुम्हाला भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी मत दिल्याची आठवण करून देत आमदारांना आपण घर बाधून देणार आहे. मग आम्हाला का नाही? असा सवाल महिला व पुरुष नागरिकांनी भुजबळांना केला.