“जा लढ, मी आहे…”, बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मनसेकडून व्हीडिओ शेअर करत अभिवादन, राज ठाकरेंचा ‘हा’ व्हीडिओ; म्हणाले…

    मुंबई- आज हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यामुळं राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. दरम्यान, आज विधानभवनात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त तैलचित्राचे अनावरण (सोमवार 23 जानेवारीला) होणार आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी (Birth Annivesary) औचित्य साधत त्यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. या महान नेत्यास अनेक राजकीय नेते ट्विटच्या माध्यमातून अभिवादन करत ट्विट करत आहेत, त्यातच आता मनसेकडून (MNS) एक व्हीडिओ शेअर करत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

    काय म्हटलंय ट्विटमध्ये?

    हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मदिनी विविध राजकीय पक्ष व विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना अभिवादन करत आहेत. तर दुकरीकडे मनसेनं ट्विट करत एक व्हीडिओ शेअर करत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. “जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात… राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा ‘राज’कीय संवाद!” असं या ट्विटमध्ये मजकूर लिहिला आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये “ह्या मनगटास तूच शिकवली लढण्याची वहिवाट, कोट कोट हृदयांचा केवळ एक हृदयसम्राट!” असं म्हटलं आहे.

    व्हीडिओत राज ठाकरेंनी काय म्हटलंय?

    दरम्यान, मनसेनं मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, तेव्हाच प्रसंग त्यांनी सांगितलेला हा व्हीडिओ आहे. “मी बाळासाहेबांना मातोश्रीवर भेटायला गेलो होतो, तिथे मनोहर जोशी होते, तेव्हा त्यांनी मला मिठी मारली…आता जा बोलले…त्यांना मी सांगून शिवसेना सोडली आहे. तसेच माझे बंड हे छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नाही. मी बाळासाहेबांना भेटून शिवसेना सोडली असल्याचं राज ठाकरेंनी या व्हीडिओत म्हटलं आहे.” अशा प्रकारचा व्हीडिओ मनसेनं शेअर करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.