Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणेकरांसाठी खुशखबर ! गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. वर्षानुवर्षे ट्रॅफिकच्या विळख्यात सापडलेल्या घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी आता दूर होणार आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 09, 2026 | 06:51 PM
गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी

गायमुख ते फाउंटन बोगद्याला मान्यता, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालादेखील मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • वर्षानुवर्षे ट्रॅफिकच्या विळख्यात सापडलेल्या घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी आता दूर होणार
  • गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या प्रकल्पाला मंजुरी
  • नवी मुंबई मेट्रो मार्ग १ ए आणि मार्ग २ च्या कामालाही ग्रीन सिग्नल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. वर्षानुवर्षे ट्रॅफिकच्या विळख्यात सापडलेल्या घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी आता दूर होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या १७ हजार ३६ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, नवी मुंबई मेट्रो मार्ग १ए आणि मार्ग २ च्या ५ हजार ५७५ कोटी रुपयांच्या कामालाही ग्रीन सिग्नल मिळाला आहे. एकूण २२ हजार ६११ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मंत्रालयात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान ५.८६ किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान ९.५८ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल; तसेच राष्ट्रीय महामार्ग-४८च्या दृष्टीने अधिक वेगवान आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. हा भुयारी मार्ग टीबीएम तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात येणार असून, त्याचा व्यास १४ मीटर असेल. सुमारे पाच वर्षांत हा बोगदा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर वसई खाडीला समांतर जाणाऱ्या उन्नत पुलावर ताशी १०० किलोमीटर वेगाने वाहतूक शक्य होणार आहे.

Ulhasnagar News: रस्ते खणले, मार्ग बंद केले; खोदकामांमुळे उल्हासनगरातील वाहनचालकांचा प्रवास झाला त्रासदायक

घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक आणि जड वाहनांचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतः ठाणे व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे; तसेच प्रकल्प परिसरात एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मान्यता दिली.

सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग १ ए (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि मेट्रो मार्ग २ (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-४) या प्रकल्पास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण २८ किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. या विस्तारामध्ये मार्ग १ ए वर दोन आणि मार्ग २ वर अकरा स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात दररोज सुमारे १२ लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे.

Thane Fire News : मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात 

Web Title: Godbundar road gaymukh to fountain hotel tunnel project approves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • thane

संबंधित बातम्या

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! मंत्रालयीन विभागांची होणार पुनर्रचना, प्रशासकीय विभागांची संख्या वाढणार
1

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! मंत्रालयीन विभागांची होणार पुनर्रचना, प्रशासकीय विभागांची संख्या वाढणार

Nashik Politics: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा कायम; गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष
2

Nashik Politics: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा कायम; गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष

मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय; विद्यार्थी, उद्योग आणि GST बाबतीत महत्वाचे निर्णय…
3

मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय; विद्यार्थी, उद्योग आणि GST बाबतीत महत्वाचे निर्णय…

Thane Fire News : मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात
4

Thane Fire News : मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.