चोरट्यांकडून सोन्या-चांदीचे दागिने जप्त,चोरट्यास अटक; ८ लाख ५७ हजार २१५ रूपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

विटा (Vita) येथील यशवंतनगरमधील (Yashwantnagar) बंद घर (Home) फोडून लोखंडी तिजोरीत ठेवलेले ८ लाख ५७ हजार २१५ रूपयांचे सोन्या - चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास पकडून त्याच्या ताब्यातील दागिने हस्तगत केले. अभिजीत वसंत ठोंबरे (वय २२, मुंढे मळा विटा) असे संशयित चोरट्याचे नांव असून त्यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

    सांगली : विटा (Vita) येथील यशवंतनगरमधील (Yashwantnagar) बंद घर (Home) फोडून लोखंडी तिजोरीत ठेवलेले ८ लाख ५७ हजार २१५ रूपयांचे सोन्या – चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास पकडून त्याच्या ताब्यातील दागिने हस्तगत केले. अभिजीत वसंत ठोंबरे (वय २२, मुंढे मळा विटा) असे संशयित चोरट्याचे नांव असून त्यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

    यशवंतनगरमधील तेजस गिरीधर तारळेकर यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी लोखंडी तिजोरीत ठेवलेले ८ लाख ५७ हजार २१५ रूपयांचे २८१.०२ ग्रॅमचे सोन्याचे व ४३९.१३ ग्रॅमचे चांदीचे दागिने ३० डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत चोरून नेले होते. तशी फिर्याद तारळेकर यांनी विटा पोलिसांत दिली होती.

    त्यानुसार चोरट्याचा शोध पोलीस घेत होते. विटा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना (ता. १७) गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार अमर सुर्यवंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत एक संशयित इसम साळशिंगे रोड विटा येथे संशयित रित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नांव व गांव विचारले असता त्याने त्याचे नांव अभिजीत वसंत ठोंबरे (मुंढे मळा विटा) असे सांगितले.

    त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तारळेकर यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून २ लाख ८५ हजार ४०० रुपयांच्या सोन्याच्या दोन पाटल्या व चार बांगड्या, १ लाख ७५ हजाराचे सोन्याचे दोन तोड, २ लाख ३ हजार ५० हजाराचे एक सोन्याचे ब्रेसलेट, १ लाख १ हजार ५२५ रूपयांची सोन्याची मोहनमाळ, ३० हजार ८७५ रूपयांचा सोन्याचा नेकलेस, ३० हजार ३५० रूपयांचा व १५ हजार २७५ दोन सोन्याचा टॉप्स जोड, १ हजार ९५० रूपयांची सोन्याची बाली, ६५० रूपयांची एक सोन्याची चमकी, ८ हजार ९७० रूपयांचे चांदीचे मोठे ६ गोल कॉईन, १ हजार १९० रूपयांचे लहान चांदीचे ४ कॉईन, १५० रूपयांचा १ लहान चांदीचा कॉईन, ६६० रूपयांची दोन लहान व एक मोठ्या आकाराचे चांदीचे कडे, २ हजार १७० रूपयांचे एक जोड चांदीचे पैजण असा ८ लाख ५७ हजार २१५ रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याचे डोके यांनी सांगितले.

    ही कारवाई पोलीस अमरसिंह सूर्यवंशी, हणमंत लोहार, राजेंद्र भिंगारदेवे, सुरेश भोसले, शशिकांत माळी, रोहित पाटील, अक्षय जगदाळे, महेश देशमुख, वैभव कोळी, पुंडलिक कुंभार, कॅप्टनसाहेब गुंडवाडे यांनी केली.