आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यशोदामध्ये पॉलिटेक्निक ॲडमिशनची सुवर्णसंधी

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पॉलिटेक्निक अभ्यास क्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास असे विद्यार्थी २९ सप्टेंबर २०२२ पूर्वी महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन प्रवेश अर्ज करू शकतात.

    सातारा : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पॉलिटेक्निक अभ्यास क्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास असे विद्यार्थी २९ सप्टेंबर २०२२ पूर्वी महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन प्रवेश अर्ज करू शकतात.

    कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याकडे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळ विशेष लक्ष देताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी पॉलिटेक्निकच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतात तर एक वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणारे विद्यार्थी पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ शकतात.

    यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारामध्ये थेट द्वितीय वर्षासाठी सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग आदी विद्या शाखा उपलब्ध आहेत तर प्रथम वर्षासाठी कम्प्युटर इंजिनीअरिंग या विद्याशाखेचा देखील समावेश करण्यात आला आहे. संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया ही दिनांक २९ सप्टेंबर २०२२ पर्यंत चालू असल्याने अधिकाधिक विद्यार्थीनी चालू शैक्षणिक वर्षात पॉलीटेक्निक अभ्यास क्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन यशोदा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. डि. एस. बडकर यांनी केले.

    आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची ही सुवर्ण संधी असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असे ते म्हणाले.
    यशोदामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे अत्यंत बारकाईने पाहणारा शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी प्रयत्न करणारा प्लेसमेंटसेल, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवले जाणारे विषय, इंडस्ट्रियलव्हिजिट, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन आदी गोष्टींमुळे पॉलिटेक्निक प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे.