ट्रकचालकासह भावाला धमकावून ४ तरुणांनी लुटले हजारो रुपये, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

देवरी पोलिसांनी चार दिवस विविध पथकांद्वारे याचा तपास करून या गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या युवकांचा तपास लावून त्यांना अटक केली.

    गोंदिया : गोंदिया जिल्ह्यामधील देवरी येथे अमरावतीवरून व्यापाऱ्यांचे कृषी खत घेऊन आलेल्या ट्रकमध्ये एक चोरटयांनी धमकी देऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला. या ट्रेकचालकांचे नाव फिरोजखा गुलाम हुसेन खान असे आहे आणि हा चालक ३८ वर्षाचा आहे. हा ट्रकचालक रात्री १० वाजता जेवण करत असताना ट्रकमध्ये प्यायचे पाणी नसल्यामुळे त्याने आपल्या भावाला पाणी आणण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवले आणि तो चालक जेवण करत असताना अज्ञात चार युवक हे ट्रकमध्ये घुसले त्यांच्या तोंडावर काळा रुमाल बांधला. हे चार युवक वीस ते पंचवीस वयोगटातील होते.

    या चोरटयांनी ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवला आणि चालकाला म्हणाला, तुझ्याजवळ किती पैसे आहेत? ते दे, नाहीतर तुझा मर्डर करू. ट्रक चालकाने आपल्या जवळ असलेले २८०० रुपये त्या चोरटयांना दिले दुसऱ्या युवकांनी त्यांच्या जवळ असलेली चावी हिस्कावाली आणि ट्रक रायपूरच्या दिशेने नेला. भरेगाव फाट्याजवळून त्यांनी ट्रक देवरीच्या दिशेने पलटविला. त्यांनी ड्रायव्हरला आपल्या भावास फोन करायला सांगितला. तर ड्रायव्हरने आपल्या भावाला फोन केला आणि तुझ्या जवळ आलेल्या व्यक्तींना तुझ्या जवळचे पैसे देऊन टाक नाहीतर हे मला मारून टाकतील असे सांगितले.

    चोरट्यांच्या दुसऱ्या साथीदारांनी चालकाच्या भावाला धमकावून त्यांच्या जवळचे ५५०० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर हे चोरटे चारही पांढऱ्या रंगाच्या कारने ट्रक जवळ येऊन आपल्या साथीदारांना घेऊन देवरीच्या दिशेने पळाले. ट्रॅक चालकाने या विषयीची तक्रार देवरी पोलीस स्टेशन येथे दाखल केली. देवरी पोलिसांनी चार दिवस विविध पथकांद्वारे याचा तपास करून या गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या युवकांचा तपास लावून त्यांना अटक केली. या युवकांकडून मोबाईल, नगदी रुपये आणि पांढऱ्या रंगाची कार जप्त केली आहे.