Gondias flight service will be closed The eclipse took place in just five months

जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरू झालेली ही विमानसेवा अचानकच बंद होत असल्याने जिल्हावासियांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. फ्लायबिग एअरलाइन्सच्या वतीने काही महिन्यांपूर्वीच गोंदिया ते हैदराबाद आणि इंदूरची विमानसेवा सुरू करण्यात आली होती. आता मात्र, फ्लायबिग एअरलाइन्सने (Flybig Airlines) सुरू केलेली ही विमानसेवा २१ ऑगस्टपासून बंद होणार आहे.

  गोंदिया : अवघ्या पाच महिन्यांपूर्वी बिरसी विमानतळावरून (Birsi Airport) सुरू झालेल्या प्रवासी विमानसेवेला ग्रहण लागले असून येत्या २१ ऑगस्टपासून बिरसी येथील विमान सेवा बंद (Airline service shut down) होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरू झालेली ही विमानसेवा अचानकच बंद होत असल्याने जिल्हावासियांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  खासदार प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री असताना बिरसी विमानतळ आणि पायलट प्रशिक्षण केंद्राच्या (Birsi Airport and Pilot Training Centres) उभारणीमुळे या परिसराला मोठी ओळख मिळाली होती. त्यातच विद्यमान खासदार सुनील मेंढे (MP Sunil Mendhe) यांचेही प्रयत्नही फळाला आले होते. दरम्यान, फ्लायबिग एअरलाइन्सच्या वतीने काही महिन्यांपूर्वीच गोंदिया ते हैदराबाद आणि इंदूरची विमानसेवा सुरू करण्यात आली होती. आता मात्र, फ्लायबिग एअरलाइन्सने (Flybig Airlines) सुरू केलेली ही विमानसेवा २१ ऑगस्टपासून बंद होणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीने २१ ऑगस्टपासून तशा बुकिंगही बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

  असहकाराचा आरोप

  २० ऑगस्ट रोजी गोंदिया विमानतळावर प्रवासी विमानाचा शेवटचा दिवस असेल आणि संकेतांनुसार, विमान कंपनी सुरू झाल्यापासून, स्थानिक विमानतळ प्रशासनावर विमान कंपनीकडून असहकाराचे (Allegations of non-cooperation by the airline) आरोप केले जात आहेत, तरीही कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर आता नाईलाजाने फ्लाय बिग कंपनीने विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर एक – दोन दिवसांत त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  प्रशासनाची हिटलरशाही

  १३ मार्च रोजी बिरसी येथून विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर पहिल्या दिवशी केवळ टर्मिनल इमारतीजवळ (डिपार्चर गेट) विमान उभे करण्यात आले. मात्र, त्यानंतर टर्मिनल इमारतीजवळ विमान उभे करण्यासाठी कंपनीकडून अनेक वेळा विनंती करण्यात आली, मात्र प्रशासनाने हिटलरशाही करून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सदर विमान टर्मिनल इमारतीपासून दूर उभे केले जात होते. परिणामी प्रवाशांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असताना विमान लँडींगलाही (Airplane landing) अडचणी येत होत्या.

  स्पष्ट दृश्यमानताही होती समस्या

  एकीकडे विमानतळ प्रशासनाचा असा असहकार तर दुसरीकडे अस्पष्ट दृश्यमानताही विमानाच्या लँडिंगमध्ये मोठा अडथळा ठरत होती. विशेष म्हणजे, स्पष्ट दृश्यमानतेअभावी यापूर्वी हैदराबादहून उड्डाण करणारे विमान थेट इंदोरला नेण्यात आले तर इंदोरहून आलेल्या विमानाच्या बिरसी विमानतळावर आकाशात अधिक वेळापर्यंत उड्डाण केल्यानंतर नागपूर विमानतळावर उतरवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: अस्पष्ट दृश्यमानतेबाबत वैमानिकाने अनेक वेळा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी बोलणे करूनही विमानाला येथे उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही.

  या जिल्ह्यांनाही होता लाभ

  गोंदिया येथून विमानसेवा सुरू झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील नागरिकच नव्हे तर शेजारील बालाघाट, सिवनी, राजनांदगाव आदी जिल्ह्यातील व्यापारी, अधिकारी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात विमान प्रवासाचा लाभ होत आहे. बिरसी विमानतळावर हैदराबाद आणि इंदोरला जात होते. त्यातच गोंदियाला दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आदी मेट्रो शहरांच्या विमानसेवेची भेट मिळेल, अशी अपेक्षा होती, परंतु आता यावरही संभ्रम निर्माण झाले आहे.