nana patole

महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून, पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. मोदी सरकारची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही.

    मुंबई : महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून, पहिल्या टप्प्यातील विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. मोदी सरकारची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षाच्या तानाशाही सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

    टिळक भवनमध्ये पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. ‘राहुल गांधी जर सावरकर चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन’ या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा पटोले यांनी समाचार घेतला. मोदींवरचा सिनेमा फ्लॉप झाला, नितीन गडकरींवरील हायवे मॅन सिनेमा फ्लॉप झाला. गोडसेवरील चित्रपट फ्लॉप झाला आणि सावरकर चित्रपटही फ्लॉप झाला आहे.

    तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पहावा, गांधी विचारासाठी फडणवीसांनी हा चित्रपट पाहावा, राहुल गांधी यांच्याशी तुलना करु नका, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशाच्या जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे, असे ते म्हणाले.