दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शासनाकडून प्रति लिटर दुधाला ५ रुपये प्रमाणे हमीभाव जाहीर

    इंदापूर : शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळावा याकरिता शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक काटे व माऊली वणवे यांनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर आकरा दिवस आमरण उपोषण केले होते. या आमरण उपोषणाची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांच्या प्रति लिटर दुधाला ५ रुपये प्रमाणे हमीभाव जाहीर केला. या निर्णयाचे इंदापूरातील शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आणि याच पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना दुग्ध अभिषेक घालत पेढे भरवत शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.

    इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी (दि.२१) दूध उत्पादक शेतकरी व शिवधर्म फाउंडेशन च्या कार्येकर्त्यांनी एकत्र येत शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष केला.

    याप्रसंगी बोलताना शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक काटे म्हणाले की, सरकारने घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. परंतू, हा निर्णय खाजगी दूध संघाना देखील लागू व्हावा.दूध व्यवसाय हा शेतकऱ्याचा जोडधंदा न राहता तो आत्ता जगण्याचे प्रमुख साधन बनला आहे.२५ डिसेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करणार आहोत.त्यानंतर खाजगी दूध संघाना जर हा निर्णय लागू झाला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा ही दीपक काटे यांनी याप्रसंगी दिला आहे.

    यावेळी चंद्रकांत गोसावी, करणसिंह ढाणे पाटील, कृष्णा क्षीरसागर, दादासाहेब भोसले, विजय डोंगरे, विशाल धुमाळ, संदीप धनवे, पिंटू बोडके, आकाश बोरडे, अनिल चव्हाण, संजय किरकत, महादेव सूर्यवंशी, रोहित जगदाळे, सौदागर खबाले, किरण साळुंके आदी उपस्थित होते.