मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! सार्वजनिक बाप्पांच्या दर्शनासाठी 9 दिवस ‘बेस्ट’ रात्रभर धावणार, जाणून घ्या मार्ग?

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्रभर बेस्टसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे

    मुंबई : महाराष्ट्रतील किंवा मराठी आवडता व लाडका सण म्हणजे चौदा विद्या आणि चौष्ठ कलांचे अधिपती दैवत म्हणजे गणपती. (Ganesh Festival) आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी वर्षभर मुंबईकर वाट पाहत असतात. यावर्षी गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाठात, जल्लोषात स्वागत होत आहे. या धरतीवर मुंबईतील बेस्ट एक अतिशय महत्त्वाचा व आनंदाचा निर्णय़ मुंबईकरांसाठी घेतला  आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्रभर बेस्टसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Good news for Mumbaikars! ‘Best’ will run through the night for 9 days for public Baba Darshan)

    रात्रभर बस सेवा कुठे?

    यंदा मुंबईतील गणेशभक्तांचा उत्साह पाहता १९ सप्टेंबर ते २७ सप्टेंबरपर्यंत अतिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. उत्तर पश्चिम मुंबईकडे गिरगाव, परळ, लालबाग, चेंबूरमार्गे प्रवर्तित होणार आहेत. या बस रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंतसेवेत असतील. नऊ मार्गांवर २७ अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत रात्रभर बस सेवा देण्याचे नियोजन केले होते. मुंबई पोलिस, रेल्वे, बेस्ट, रेल्वे सुरक्षा बल यांसारख्या विविध प्राधिकरणांची बैठक घेतली झाली. या बैठकीत, गणेशोत्सवकाळात मुंबईत फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बेस्ट आणि रेल्वेने रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी, यावर एकमत झाले.

    २० ते २८ जादा बसगाड्या

    नियमित बसगाड्यांव्यतिरिक्त २० ते २८ जादा बसगाड्या या रात्रभर सेवा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाच ते सहा विविध मार्गांवर या बस चालवण्यात येणार आहेत. या बसगाड्यांची सेवा २४ तास असेल. तसेच गणेशोत्सवकाळात पहिल्या पाच दिवसांत घरगुती गणपतीनिमित्त अनेक जण गावी जातात किंवा काहींच्या मुंबई महानगरातील घरीच गणपती येतो. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत मुंबईत रात्रभर बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.