पुणे शहरात विविध मंदिरात धार्मिक पद्धतीने गोपळकाला; मोठमोठ्या थरांच्या दहीहंडी शहराच्या विविध भागात

  पुणे : विविध मंदिरात धार्मिक पद्धतीने गाेपाळकाला तर गणेश मंडळांकडून ‘स्पीकर’च्या दणदणाट दहीहंडी उत्सव शहरात उत्साहात साजरा केला गेला. पुण्यात रात्री उशिरापर्यंत गाेविंदा पथकांकडून दहीहंडी फाेडण्यात येत हाेत्या.

  पुणे शहरात सर्व ठिकाणी श्रीकृष्ण जन्म साजरा

  बुधवारी अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्म साजरा केल्यानंतर गुरुवारी दहीहंडी उत्सव शहरात नेहमीच्या उत्साहात साजरा केला गेला. शहरातील एस्काॅन मंदिरासह इतर मंदिरात गाेपालकाला धार्मिक पद्धतीने साजरा केला गेला. तर विविध गणेश मंडळांकडून, राजकीय नेत्यांकडून दहीहंडी  उत्सवाचे आयाेजन केले गेले हाेते.

  दहीहंडी उत्सव हा पूर्वी आकर्षण

  शहराच्या मध्यवर्ती भागातील दहीहंडी उत्सव हा पूर्वी आकर्षण ठरत असे, परंतु गेल्या काही वर्षांत उपनगरातही जाेरात दहीहंडी उत्सव साजरा केला जाऊ लागला आहे. महमंदवाडी येथे प्रमाेद भानगिरे मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयाेजन केले गेले. यानिमित्ताने लावणीचा कार्यक्रम आयाेजित केला गेला. काेथरूड येथे शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती.

  शहराच्या मध्यवर्ती भागात सुवर्णयुग तरुण मंडळाची मोठी हंडी

  माजी नगरसेवक राजाभाऊ गाेरडे यांनी याचे आयाेजन केले हाेते. शहराच्या मध्यवर्ती भागात सुवर्णयुग तरुण मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि गुरुजी तालीम मंडळ, अखिल गणेश पेठ पांगुळ आळी दहीहंडी उत्सव, पतित पावन संघटना( गाेविंद हलवाई चाैक), आदी मंडळाच्या दहीहंडी या नेहमीप्रमाणे आकर्षण ठरल्या हाेत्या.
  आकर्षक सजावट आणि दिव्यांगांचा झगमगाट
  शहरातील प्रमुख रस्ते, गल्लाे गल्ली आकर्षक सजावट करण्यात आलेल्या दहीहंडी लक्षवेधी ठरत हाेत्या. दहीहंडीच्या भाेवती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्या जाणाऱ्या दिव्यांचा झगमगट यात भर घालत हाेता. साधारणपणे पुण्यात संध्याकाळी दहीहंडी फाेडण्यास सुरुवात हाेती. जशी वेळ सरत गेली तसा उत्साह रस्त्यावर सळसळून वाहु लागला हाेता. मध्यवर्ती भागात माेठ्या प्रमाणावर गर्दी झाली हाेती. उपनगरात उपलब्ध मैदानांवर दहीहंडी आयाेजित करण्यावर भर दिसुन आला.
  आकर्षक बक्षीसे आणि गाेविंदा पथकांचा थरार
  दहीहंडी फाेडणाऱ्या गाेविंदा पथकांना लाखाे रुपयांचे बक्षीस दहीहंडी उत्सव मंडळांच्यावतीने जाहीर केले हाेते. याचे फलक गेल्या काही िदवसापासून झळकत हाेते. याच वेळी गाेविंदा पथकाकडून एकावर एक थर रचन्याचा सराव केला जात हाेता. पुण्यातील कसबा, मंगळवार पेठेत गाेविंदा पथकांची संख्या अधिक अाहे. यामध्ये शिवतेज संघ, वंदेमातरम, राधाकृष्ण, शहीद भगतसिंग मित्र मंडळ, भाेईराज मित्र मंडळ अादी गाेविंदा पथकांचा समावेश अाहे. या पथकांनी शहराच्या िवविध भागात जाऊ दहीहंडी फाेडून बक्षीसाचा काला लुटला.