राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार वाचलं; आता इच्छुकांचे डोळे मंत्रिपदाकडे, सांगलीतून ‘या’ नावांची चर्चा

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालातून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे सरकारने कोणताही अतिरिक्त मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार केलेला नव्हता. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाचा वेग आणखी वाढवतील असे दिसते आहे.

    सांगली : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालातून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे सरकारने कोणताही अतिरिक्त मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार केलेला नव्हता. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाचा वेग आणखी वाढवतील असे दिसते आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्यातून आमदार अनिल बाबर व भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची नावे चर्चेत आली आहेत.

    सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसांत होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी सर्वप्रथम त्यांच्यासोबत 16 आमदार बाहेर पडले. या 16 आमदारांमध्ये अनिल बाबर होते. तसेच आमदार अनिल बाबर यांचा प्रशासकीय, राजकीय अभ्यास बघता असा अभ्यासू अनुभवी मंत्री आपल्या मंत्रिमंडळात असावा म्हणून आमदार बाबर यांचा विचार होऊ शकतो.

    पडळकरांना संधी मिळण्याची शक्यता

    राज्यातील आगामी निवडणूक लक्षात घेता भाजपकडून स्टार प्रचारक असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना यावेळी संधी मिळू शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आहेतच पण पडलकरांचा उपयोग राज्यभर करता येऊ शकतो. शिवाय धनगर समाजाला संधी दिल्याचा मेसेज देखील भाजप यानिमित्ताने देईल, तर महानगरपालिकेची निवडणूक लक्षात मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र वापरलेस मूळ भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणारे आमदार सुधीर गाडगीळ यांचे नवा सुद्धा पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.