चप्पलफेकीच्या हल्ल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजप आमदार गोपीचंद पडळवर यांच्यावर शनिवारी चप्पलफेकीची घटना घडली होती. यावरुन धनगर समाज आक्रमक झाला आहे. पडळकर यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळवर यांच्यावर शनिवारी चप्पलफेकीची घटना घडली होती. यावरुन धनगर समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात येत आहेत. तसेच अनेक ठिकाणी धनगर बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केलीये. पडळकर यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.

    पडळकर म्हणाले की, ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंधे आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला.’

    पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की, गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर, कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे, हे आम्हा सगळ्यांना माहित आहे. कारण ते स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे शत्रू आहेत. असं ते म्हणाले.

    काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर, त्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी, असे आवाहन पडळकर यांनी केले.