
माणगाव तालुक्यातील पुरार येथील आय एन टी विद्यालयात बुधवारी घडली या घटनेमुळे संपूर्ण गोरेगाव परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
माणगाव : आंतर शालेय क्रीडा स्पर्धा सुरू असताना भालाफेक स्पर्धेदरम्यान भाला डोक्यात लागल्याने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माणगाव तालुक्यातील पुरार येथील आय एन टी विद्यालयात बुधवारी घडली या घटनेमुळे संपूर्ण गोरेगाव परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. गोरेगाव पासून जवळ असलेल्या पुरार गावाजवळ असलेल्या आय एन टी स्कूलच्या मैदानावर माणगाव तालुका माध्यमिक विभागाच्या वतीने शालेय स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
यामध्ये भालाफेक सुरू असतानाच हुजेफा डावरे हा विद्यार्थी फेकलेला भाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना भाला त्याच्या डोक्यात लागून त्याचा दुर्दैवी प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान या घटनेमुळे आय एन टी स्कूल तसेच दहिवली गावावर शोककळा पसरली आहे.
गोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने मैदानावर भेट देऊन पहाणी केली. या दुःखद घटनेने दहीवली कोंड येथील डावरे कुटुंबावरती शोककळा पसरली आहे. इनायत हुर्जूक यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक यांनी दुखः व्यक्त केले.