सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगे पाटील यांची भेट; मुख्यमंत्री ऑनलाईन संवाद साधणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आग्रही होताना दिसत आहेत. त्यानुसार, यापूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. मात्र, त्यावेळी सरकारकडून त्यांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही त्यांची मागणी पूर्णपणे मान्य झालेली नाही.

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आग्रही होताना दिसत आहेत. त्यानुसार, यापूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. मात्र, त्यावेळी सरकारकडून त्यांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही त्यांची मागणी पूर्णपणे मान्य झालेली नाही. असे असताना आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात येत आहे. त्यात आता सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले आहे.

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला जरांगे पाटील व लाखो मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे निघाले आहेत. ही पदयात्रा मंगळवारी (दि. 23) दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाली होती. आता ही पदयात्रा लोणावळा येथे आहे. पदयात्रा मार्गावर पुढे आणि मागे लांबपर्यंत मराठा बांधव दिसत आहेत.

    दरम्यान, यापूर्वी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं यासाठी त्यांना काही आश्वासने दिले होते. पण आता आज सकाळी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला गेल्याचे दिसत आहे.